Kishor B. Panchal – General

तुमच्या कृपेचे छत्र, सकळांना द्यावे
साईनाथा, हे जगणे सूंदर व्हावे ||धृ||

सारे जीव भूमीवर, तुमचीचं लेकरे
तुमच्याचं कृपेने आनंद, उत्सव साजरे
सर्वांचे आयुष्य हर्ष, आनंदाने जावे
साईनाथा, हे जगणे सूंदर व्हावे ||१||

नसावा भेदभाव, द्वेष मत्सर नसावे
समता प्रेम आदर, बंधूंभाव असावे
द्यावे प्रेम इतरांना, आणि प्रेम घ्यावे
साईनाथा, हे जगणे सूंदर व्हावे ||२||

सृष्टी सगळी अतुल्य, एक ठेवा अमूल्य
कणा कणात वसले, तुमचेचं कौशल्य
तुमचे नामस्मरण आणि धन्यवाद द्यावे
साईनाथा, हे जगणे सूंदर व्हावे ||३||

– किशोर पांचाळ
वाघोली, पुणे